*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारुची वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, अंमली पदार्थाची लागवड इत्यार्दीवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. 4 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील टवळाई गावातील शेत शिवारात एका इसमाने त्याच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील टवळाई गावाचे शेत शिवाराल एका शेताची पाहणी केली असता तेथे 16 किलो 518 ग्रॅम वजनाचे 08 लाख 25 हजार 900 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली. गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आरोपी नामे घुशा ठुमल्या ब्राम्हणे रा. टवळाई ता. शहादा जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याच्याविरुद् धडगांव पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, सहा. पोलीस उप निरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, पोलीस अंमलदार राहुल बोराळे, शोएब शेख, भरत उगले यांच्या पथकाने केली.



