ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*

  • Share:

*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए.एम.ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे असलेले महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पराग पोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून सबस्टीन जयकर उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी वेदश्री पाटील व प्रियंका वळवी यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत सादर केले. इयत्ता सातवी व नववीच्या विद्यार्थिनींनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. शिक्षिका जेनिफर पंजाबी यांनीही शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य पराग पोळ यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मार्गदर्शक असतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात शिस्त, संस्कार, जबाबदारी, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिक्षक दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शाळेचे संपूर्ण कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून वर्गात जाऊन अध्यापन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका, जबाबदारी, नियोजन आणि अध्यापनातील आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ‘शिक्षक होणे म्हणजे केवळ शिकवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारणे होय’ हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा हेड बॉय कार्तिक माळी व हेड गर्ल मिशेल वळवी यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रेया काटुरे हिने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. फरहाना शेख, सांस्कृतिक विभागाचे सदस्य शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी परिषदेने विशेष परिश्रम घेतले. खंदारे यांनी आकर्षक फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शिक्षकांविषयी आदर, कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व जबाबदारीची भावना निर्माण करणारा हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
September, 05 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज