*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
कशेळी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कशेळी-आवळीची वाडी परिसरातील नागरिकांच्या उत्साहाला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, तसेच गणरायाचे आगमन अधिक उत्साहात व आनंदात साजरे व्हावे, या उद्देशाने आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई यांच्या वतीने ‘भव्य गणपती सजावट स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ आवळीची वाडीपुरती मर्यादित राहणार असून, नागरिकांनी आपल्या कल्पकतेला आणि कलाकौशल्याला वाव देत गणपतीची आकर्षक सजावट करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सजावटीमध्ये शक्यतो पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कलाकुसरीला प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण योग्य पद्धतीने सजावटीचे निरीक्षण करून परीक्षकांकडून करण्यात येणार असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1500 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी 1000 व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी 500 व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. गणपती सजावट स्पर्धेचे परीक्षण 14 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे, त्यामुळे आवळीची वाडीतील नागरिकांनी आपल्या कल्पकतेला आणि कलेला वाव देत मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आवळीचीवाडी क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आले आहे. “चला तर मग, आपल्या कल्पकतेला आणि कलेला वाव देऊया… सजावट करूया, गणरायाचे स्वागत करूया आणि स्पर्धेचा आनंद घेऊया!” असे आवाहन आयोजक आवळीची वाडी क्रिकेट संघ, मुंबई (क्रिकेट समिती) यांच्या वतीने करण्यात आले आहे.



