*लाखापूर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी उपक्रमातून साकारल्या पर्यावरणपूरक राख्या,राखीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जिंकली पालकांची मने*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी उपक्रमातून साकारल्या पर्यावरणपूरक राख्या,राखीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जिंकली पालकांची मने*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी उपक्रमातून साकारल्या पर्यावरणपूरक राख्या,राखीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जिंकली पालकांची मने*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून, अनुभवातून आणि कलाकौशल्यातून विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक राख्या तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम साहित्याचा वापर न करता पाने, फुले, नैसर्गिक घटक तसेच उपलब्ध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक, रंगीबेरंगी आणि कल्पक राख्या साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांची विद्यालयात आकर्षक प्रदर्शनी भरविण्यात आली. या प्रदर्शनाला पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या सुंदर राख्या पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून त्यांच्या अंगी असलेली कल्पकता, सर्जनशीलता आणि पर्यावरणा विषयीची जाणीव अधोरेखित झाली.
यानंतर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगल पावरा होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विनोद राणे यांनी केले.
उत्कृष्ट राखी निर्मिती उपक्रमासाठी श्रीमती सुवर्णा कोळी, फिरोज अली सय्यद, चांदो पाडवी आदी शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या कल्पनेतून सुंदर राख्या तयार केल्या. यावेळी उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करताना, भाऊ- बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि अतूट बंधनाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला जातो, असे सांगितले. तसेच सण साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षक अनिल भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, मंगल पावरा, सागर पाडवी आदींनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांच्या या उपक्रमातून सर्जनशीलता संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन” यांचा सुंदर संगम घडून आला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.



