*अनुबाई सोनवणे आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षितता विषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न,महिला समुपदेशन केंद्र,पोलीस स्टेशन आवार शहादा यांचा उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुबाई सोनवणे आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षितता विषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न,महिला समुपदेशन केंद्र,पोलीस स्टेशन आवार शहादा यांचा उपक्रम*
*अनुबाई सोनवणे आश्रमशाळेत विद्यार्थिनी सुरक्षितता विषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न,महिला समुपदेशन केंद्र,पोलीस स्टेशन आवार शहादा यांचा उपक्रम*
शहादा(प्रतिनिधी):-अनरदबारी शिवारातील अनुबाई सोनवणे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे युवकमित्र परिवार संस्था कोठली संचलीत महिला समुपदेशन केंद्र पो.स्टे.आवार शहादा मार्फत विद्यार्थिनी सुरक्षाविषयक जनजागृती कार्यशाळा यशस्वी पार पडली. यावेळी विद्यार्थिनींना चाईल्ड हेल्पलाईन च्या प्रकल्प समन्वयक सपना नगराळे, भाग्यश्री पाटील तसेच युवकमित्र संस्था संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका आरती शिंदे, अर्चना पावरा, बालसंगोपन कार्यकर्त्या संगीता वळवी यांनी यावेळी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच बद्दल माहिती, बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायद्यासह विविध कायद्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच संकटसमयी 1098 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन, सामाजिक कार्यकर्ते सुनील वळवी, भरत पावरा प्राथमिक चे मुख्याध्यापक सतीश पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक दीपक गिरासे यांच्यासह शाळेचे शिक्षक एम.बी मन्सूरी, एच एम सोनार, एन आर वसावे, योगेश डामरे, एन.आर. वसावे, जी.पी. वसावे, एस.बी. शाह, एन.आर. सूर्यवंशी, शिक्षिका हिरावती सोनवणे, प्रतीक्षा पाटील वसतिगृह अधीक्षक मोनिका चव्हाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार सुनील वळवी यांनी मानले.



