*शेतीच्या वादातून चुलत मामास जिवेठार मारणाऱ्या आरोपी भाच्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व 11 हजार रुपयांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेतीच्या वादातून चुलत मामास जिवेठार मारणाऱ्या आरोपी भाच्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व 11 हजार रुपयांचा दंड*
*शेतीच्या वादातून चुलत मामास जिवेठार मारणाऱ्या आरोपी भाच्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व 11 हजार रुपयांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मोलगी पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादी नामे सोन्या बामण्या वळवी, वय-28, रा. डनेल कुंडीबारपाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यांचेसह त्यांचा मोठा भाऊ खुमा बामण्या वळवी वय-35 व चुलत भाचा कुमजी देवजी पाडवी यांच्यात काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु होता. त्यामुळे कुमजी पाडवी हा सोन्या वळवी व खुमा वळवी या दोन्ही भावांना जिवेठार मारण्याबाबत धमकावत होता.
13 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास कुमजी हा दारुच्या नशेत फिर्यादी सोन्या वळवी व खुमा वळवी यांचे घराजवळ हातात कुऱ्हाड आणून शेतीचा वाद उकरुन काढत सोन्या वळवी व खुमा वळवी यांना शिवीगाळ करीत होता. तेव्हा खुमा वळवी व सोन्या वळवी यांनी कुमजी पाडवी यास समविण्यासाठी त्याचे जवळ गेले होते. त्यावेळी आरोपी कुमजी याने रागाचे भरात त्याच्या हातातील कुन्हाडीने खुमा याच्या मानेवर दोन ते तीन वार केल्याने खुमा हा जमिनीवर पडला होता. त्यानंतर कुमजी याने कुऱ्हाड फेकून देवून दगडाने फिर्यादी सोन्या वळवी यांचे डोक्यावर मारुन दुखापत केली व तो तेथून पळून गेला होता. नंतर फिर्यादी सोन्या वळवी यांनी स्वताला सावरत ते आणि त्यांची वहीनी असे खुमा यास उचलण्यासाठी गेले असता खुमा हा जागेवरच मयत झालेला असल्याचे लक्षात आले होते. तेव्हा सोन्या वळवी यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिना सदर घटना असल्याचे सांगितले होते. त्यावरुन मोलगी पोलीस ठाणे येथे आरोपीविरुध्द गु.र.नं. 16/2019, भा.द.वि. कलम 302,324,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मोलगी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे यांनी केला असून आरोपी कुमजी देवजी पाडवी वय -49, रा.डनेल कुंडीबारपाडा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यास तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश-1, शहादा अ. वि. गुजराथी यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, डॉक्टर साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी कुमजी देवजी पाडवी विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, शहादा यांनी भा. द.वि.क.-302,324 अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व एकुण 11,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति, सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि योगिता राठोड, पोउपनि- सागर गाडीलोहार आणि पैरवी अंमलदार पो.कॉ. गोकुळ बंजारा, पो. कॉ. सचिन परदेशी, पो.कॉ. देविदास सुर्यवंशी, पो. हे, कॉ/शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा सुभाष भोये यांनी अभिनंदन केले आहे.



