ताजा खबरे:
*बेटकबिलोली ग्रा.पं.च्या 21.50 लाखांच्या देयकांवर प्रश्नचिन्ह प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करा मागणी*
*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
*महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
*नरसीच्या लहुजी नगरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप*
*ग.स.बँक निवडणूक: उद्या मतदान;'लोकमान्य पॅनल'ला विजयी करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए.एम.ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि विविध क्रीडा उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि खेळातून शिस्त, संघभावना व आत्मविश्वास विकसित करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील क्रीडा शिक्षकांचा प्राचार्य पराग पोळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर, क्रीडा शिक्षक आशिष वळवी व अजय वळवी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शिक्षिका सौ. मेघना मोरे यांनी आपल्या मनोगतातून क्रीडा क्षेत्रातील विविध संधी, नियमित व्यायामाचे महत्त्व तसेच खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी चालना याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेची हेड गर्ल मिशेल वळवी हिने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थी अर्णव राजपूत, लावण्या बालाणी, कनिष्का गावित, राधिका जाधव आणि इयत्ता नववीतील विद्यार्थिनी देवयानी पाटील यांनीही राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व, मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्त्व याविषयी माहितीपूर्ण मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पराग पोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले. खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चिकाटी, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व कौशल्याधारित क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रस्सीखेच स्पर्धा, हळू सायकल चालविणे स्पर्धा आणि पेनल्टी शूटआउट स्पर्धेचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती, संघभावना आणि उत्तम कौशल्याचे दर्शन घडविले.
विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनाही भविष्यात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन हेड बॉय कार्तिक माळी आणि हेड गर्ल मिशेल वळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रीन हाऊसच्या व्हाईस प्रिफेक्ट भाविका चौधरी हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. फरहाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक आशिष वळवी, अजय वळवी तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती उत्साह निर्माण झाला असून, “खेळा, तंदुरुस्त राहा आणि निरोगी जीवन जगा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बेटकबिलोली ग्रा.पं.च्या 21.50 लाखांच्या देयकांवर प्रश्नचिन्ह प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करा मागणी*
August, 29 2026
*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
August, 29 2026
*महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
August, 29 2026
*नरसीच्या लहुजी नगरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप*
August, 29 2026
*ग.स.बँक निवडणूक: उद्या मतदान;'लोकमान्य पॅनल'ला विजयी करण्याचे आवाहन*
August, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज