*नरसीच्या लहुजी नगरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसीच्या लहुजी नगरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप*
*नरसीच्या लहुजी नगरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप*
नरसी(प्रतीनिधी):-येथील लहुजी नगर परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, शैक्षणिक साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले.
जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शेख बशिरसर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पोलीसपाटील इब्राहिमबेग पटेल, जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर टोकलवाड, राजेश पा. शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक शेख बशीर, गंगाधरराव गंगासागरे, जीवन विकास शाळेचे जिलानी बागवानसर, रमेश ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि लेखणीतून उपेक्षित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा मांडत सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या जयंती सोहळ्याचे संयोजक संतोष घोडके यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप केल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास नागरिक, पालक, विद्यार्थी व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



