*ग.स.बँक निवडणूक: उद्या मतदान;'लोकमान्य पॅनल'ला विजयी करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग.स.बँक निवडणूक: उद्या मतदान;'लोकमान्य पॅनल'ला विजयी करण्याचे आवाहन*
*ग.स.बँक निवडणूक: उद्या मतदान;'लोकमान्य पॅनल'ला विजयी करण्याचे आवाहन*
धुळे(प्रतिनिधी):-धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, रविवार, दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निशांत विश्वासराव रंधे आणि पॅनल प्रमुख संजय शिंदे यांनी सर्व सभासद व सरकारी कर्मचारी मतदारांना आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजावण्याचे आवाहन केले आहे. बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी 'लोकमान्य पॅनल' निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले आहे. उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकमान्य पॅनलच्या अधिकृत उमेदवारांना 'ऑटो रिक्षा' या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे.
लोकमान्य पॅनलचे सर्वसाधारण धुळे व नंदुरबार मतदारसंघ गटातील उमेदवार दीपक अहिरे, आनंदराव करणकाळ, दीपक निकम, मयूर पवार, बाबुराव पाटील, प्रकाश वडचाव, देवेंद्र बोरसे, प्रशांत बोरसे, प्रवीण भदाणे, विजय कुमार माळी, अमोल शिंदे, विवेक चंद्र सोनवणे आणि वैभव सोनवणे हे आहेत तर महिला राखीव मतदारसंघातून सोनाली भांबरे आणि कविता मोरे या उमेदवार असून, सर्वसाधारण जळगाव मतदार संघातून भूपेंद्र बाविस्कर हे उमेदवारी करत आहेत. या पॅनलची निशाणी ऑटोरिक्षा आहे.
बँकेच्या प्रगतीची नवी दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत सदस्यांनी शंभर टक्के मतदान करून लोकमान्य पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन पॅनल नेतृत्वाने केले आहे.



