ताजा खबरे:
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना शेत जमीन विक्री करण्यास आवाहन*
*वनवासी विद्यालयात संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न*
*शेतीच्या वादातून चुलत मामास जिवेठार मारणाऱ्या आरोपी भाच्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व 11 हजार रुपयांचा दंड*
*बेटकबिलोली ग्रा.पं.च्या 21.50 लाखांच्या देयकांवर प्रश्नचिन्ह प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करा मागणी*
*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वनवासी विद्यालयात संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वनवासी विद्यालयात संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न*

  • Share:

*वनवासी विद्यालयात संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न*
नवापूर(प्रतिनिधी):-येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित,वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात 24 ऑगस्ट 2026 ते 27 ऑगस्ट 2026 तिथि श्रावण शुक्ल एकादशी ते श्रावण शुक्ल चतुर्दशी पर्यंत संस्कृत सप्ताह: मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात संस्कृत चित्रप्रदर्शनी स्पर्धा, संस्कृत श्लोक लेखन स्पर्धा, संस्कृत गीतगायन स्पर्धा, संस्कृत श्लोक गायन स्पर्धा, संस्कृत स्तोत्र गायन स्पर्धा, संस्कृत संभाषण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
संस्कृत चित्र प्रदर्शनी स्पर्धेत एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्कृत उपनिषद, वेद, संस्कृत अव्यय, स्तोत्र, सुभाषिते, ऋषी परंपरा, संस्कृत कवी यावर विविध चित्रे सादर करण्यात आली. संस्कृत चित्र प्रदर्शनी स्पर्धेचा निकाल प्रथम कु. समर्थ चेतन परदेसी 10 वी,
द्वितीय कु. कल्पना नटवर वसावे 8 वी, तृतीय कु. समर्पण निमेश भट्टी 9 वी,
उत्तेजनार्थ कु. खतीजा वसीम खाटीक 8 वी, कु. नितेश संदीप शिंदे 8 वी, संस्कृत श्लोक लेखन स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यात सुजनांची लक्षणं सांगणारे, दुर्जनाचे अवगुण स्पष्ट करणारे, विद्येचे महत्त्व सांगणारे, बुद्धीचा मंदपणा दूर करणारे संस्कृत सुभाषितांचे लेखन करून हसत खेळत विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. संस्कृत श्लोकलेखन स्पर्धेचा निकाल
प्रथम कु.किंजल मनीष पाडवी 10 वी, द्वितीय कु. ट्विंकल छोटू निकम 8 वी,
तृतीय कु.अप्शा शैलेश वसावे 10 वी, कु. नितेश संदीप शिंदे  8 वी,
उत्तेजनार्थ कु. रहिमा इमामुद्दीन तेली 9 वी, संस्कृत गीत गायन स्पर्धेत एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमुळे संगीतमय वातावरण निर्माण झाले. संस्कृत गीत गायन स्पर्धेचा निकाल याप्रमाणे
प्रथम इयत्ता 8 वी च्या 30 विद्यार्थी समूहाने 'कालिदासो जने जने' हे कवी कालिदासांचे सुंदर संस्कृतगीत सादर करून प्रथम क्रमांक मिळविला.
द्वितीय इयत्ता 10 वी च्या विद्यार्थी समूहाने 'लोकहितं मम करणीयम्' हे संस्कृत गीत सादर करून द्वितीय क्रमांक मिळविला.
तृतीय क्रमांक इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थी समूहाने 'भारतं भारतं भवतु भारतम्'  हे देशभक्तीपर संस्कृत गीत सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. संस्कृत श्लोक व संस्कृत स्तोत्र गायन स्पर्धा स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन, वेगवेगळे संस्कृत श्लोक व संस्कृतस्तोत्र सादर केले. प्रथम इयत्ता 10 वी च्या विद्यार्थी समूहाने 'श्रीमहिषासुर मर्दिनी स्तोत्र' सादर करून प्रथम क्रमांक मिळविला.
द्वितीय इयत्ता 9 वी च्या विद्यार्थी चमूने 'संस्कृत सुभाषित माला' सादर करून द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय  इयत्ता दहावीच्या विद्यार्थी समूहाने संस्कृत सूक्तिसुधा संस्कृत सुभाषितमाला सादर करून तृतीय क्रमांक मिळविला.
एकंदरीत या संपूर्ण संस्कृत सप्ताहात एकूण 150 विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवल्याने संस्कृत भाषेप्रती विद्यार्थ्यांची असणारी निष्ठा, प्रेम व आवड प्रकर्षाने जाणवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व आपल्या मनोगतात संस्कृत भाषेची महती सांगत विद्यार्थ्यांना महिषासुरमर्दनी स्तोत्र पाठांतर करण्याचा आग्रह केला. या स्तोत्राच्या पठणाने आपली धारणाशक्ती, स्मरणशक्ती वाढून, शब्दोच्चार स्पष्ट होतात असे सांगितले. पर्यवेक्षक प्रेमल पाडवी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगत संस्कृत भाषा ही केवळ प्राचीन भाषा नसून ती ज्ञानभाषा व संस्कारक्षम भाषा आहे व अशा भाषेच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांचे निश्चितच हित होईल असे सुंदर विचार मांडलेत. शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाला संगीत देण्याची व सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका संस्कृत शिक्षक संदीप महाले यांनी बजावली. परीक्षक म्हणून प्रदीप देसले, मंगेश देवरे व कांतीलाल वसावे यांनी काम पाहिले. संस्कृत सप्ताहाची सांगता नारळी पौर्णिमेला होणाऱ्या 'विश्व संस्कृत दिन' या कार्यक्रमाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ध्रुवी कारले, व कु. झिनल वसावे या विद्यार्थिनींनी तर आभार रोहिणी वसावे या विद्यार्थिनीने मानले. संपूर्ण शालेय परिसर जयतु संस्कृतम् | जयतु भारतम् || या जयघोषाने दुमदुमला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. 
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना शेत जमीन विक्री करण्यास आवाहन*
August, 29 2026
*वनवासी विद्यालयात संस्कृत सप्ताह उत्साहात संपन्न*
August, 29 2026
*शेतीच्या वादातून चुलत मामास जिवेठार मारणाऱ्या आरोपी भाच्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप शिक्षा व 11 हजार रुपयांचा दंड*
August, 29 2026
*बेटकबिलोली ग्रा.पं.च्या 21.50 लाखांच्या देयकांवर प्रश्नचिन्ह प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करा मागणी*
August, 29 2026
*नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
August, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज