*आडची गावात 115 वर्षाची परंपरा कायम श्रीमद् भागवत कथेचा 28ऑगस्ट राज समारोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आडची गावात 115 वर्षाची परंपरा कायम श्रीमद् भागवत कथेचा 28ऑगस्ट राज समारोप*
*आडची गावात 115 वर्षाची परंपरा कायम श्रीमद् भागवत कथेचा 28ऑगस्ट राज समारोप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आडची येथे ग्रामस्थांतर्फे गेल्या 115 वर्षापासून श्रीमद् भागवत कथेची परंपरा आजही कायम आहे, अवघी 48 घरांची उंबरे असलेल्या गुजर पटेल समाजा तर्फे श्रीमद् भागवत कथेचे नित्यनेमाने आयोजन करण्यात येते, यंदाच्या श्रावण महिन्यात आयोजित श्रीमद् भागवत कथेचा 28ऑगस्ट रोजी समारोप होत आहे, गेल्या दहा वर्षापासून वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत आहेत, श्रीकृष्ण जन्मोत्सव, श्रीकृष्ण विवाह आणि कृष्ण सुदामा भेट आदी सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते, 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा श्रीमद्भागवत कथा होईल, त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे, श्रीमद् भागवत कथा समारोप आणि प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अडची ग्रामस्थ आणि समस्त गुजर समाजाने केले आहे.



