*जखमी घुबड व घारीचे सर्पमित्राकडून रेस्क्यू; वनविभागाकडे सुखरूप सुपूर्द*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जखमी घुबड व घारीचे सर्पमित्राकडून रेस्क्यू; वनविभागाकडे सुखरूप सुपूर्द*
*जखमी घुबड व घारीचे सर्पमित्राकडून रेस्क्यू;वनविभागाकडे सुखरूप सुपूर्द*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या दोन वन्य पक्ष्यांना सर्पमित्राने तत्परतेने रेस्क्यू करून त्यांना वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द केले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
23 ऑगस्ट 2026 नंदुरबार तालुक्यातील खांडबारा गावातील दिपेश सोनार यांनी सर्पमित्राला फोन करून त्यांच्या दुकानाच्या शटरमध्ये इंडियन बार्न आउल (Indian Barn Owl) अडकले असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र ओम कोडग व राहूल कोळी घटनास्थळी पोहोचून घुबडाला सुरक्षितपणे बाहेर काढले. तपासणी केली असता त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान,27 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार शहरातील एकतानगर परिसरातील शिवारात एक घार जखमी अवस्थेत पडलेली असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र ओम कोडग व राहूल कोळी घटनास्थळी पोहोचून घारीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यामुळे या दोनीही जखमी पक्षीनां पुढील उपचार व देखभालीसाठी वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
वन्यजीव हे निसर्गाच्या परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असून, जखमी किंवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांना स्वतःहून हाताळण्याऐवजी तातडीने वनविभाग कळवा.
सर्पमित्राच्या तत्परतेमुळे दोन्ही जखमी पक्ष्यांना वेळेत मदत मिळाली असून, वन्यजीव संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



