*तलवाडे खुर्द गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तलवाडे खुर्द गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश*
*तलवाडे खुर्द गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पर्यावरण संवर्धन, हरित गावाची संकल्पना आणि सार्वजनिक परिसराचे सुशोभीकरण या उद्देशाने तलवाडे खुर्द (शनिमांडळ) गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम उत्साहात पार पडला. सुजलॉन कंपनी, संजीवन संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि गावातील तरुणांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. सुजलॉनच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमात सुजलॉनचे HR Head किशोर माळी, आकाश हीवरखडे तसेच सुजलॉनचे सुमारे 40 कर्मचारी विशेष उपस्थित होते. सुजलॉनच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाच्या कामात उत्स्फूर्तपणे श्रमदान करून सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच संजीवन संस्थेचे प्रतिनिधी सागर पकाले, सुशील गावित आणि पंकज धनगर यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी
स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्ष लावण्यापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या संरक्षणाचीही तात्काळ व्यवस्था करण्यात आली. लावलेल्या वृक्षांभोवती काटेरी कुंपण करून त्यांचे संरक्षण करण्यात आले. वृक्षांचे नियमित संगोपन, पाणी व्यवस्थापन, संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर स्वीकारण्यात आली. वृक्षारोपण ही एकदिवसीय कृती नसून, प्रत्येक लावलेल्या वृक्षाला जगविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. दीडशे किलो प्लास्टिकचे संकलन
वृक्षारोपणासोबतच स्मशानभूमी व परिसरातील सुमारे 150 किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. संकलित केलेले प्लास्टिक रीसायकलिंगसाठी देण्यात आले, त्यामुळे वृक्षारोपणा सोबतच कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त परिसराचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग या उपक्रमात साधना विद्यालय, शनिमांडळ येथील इयत्ता 10 वीच्या सुमारे 20 विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. शाळेचे शिक्षक मा. नवनीत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खड्डे खोदण्यापासून प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छतेपर्यंत उत्साहाने सहभाग घेतला. गावातील तरुण व ग्रामस्थांचे योगदान, तलवाडे खुर्द गावचे तरुण, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणशास्त्रज्ञ कैलास धनगर यांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले. सामाजिक कार्यकर्ते सोनू कोळी यांच्यासोबत गावातील इतर तरुणांनीही वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सुजलॉनचे अधिकारी व कर्मचारी, संजीवन संस्थेचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सामूहिक सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला. वृक्षारोपण प्लास्टिक संकलन वृक्षसंवर्धन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून तलवाडे खुर्द गावाने स्वच्छ, सुंदर आणि हरित गावाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.



