*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
*जि.प.नंदुरबार अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक'नियुक्तीचे आदेश वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदांमुळे रखडलेली भरती प्रक्रिया आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलणे नेहमीच गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर, कर्तव्यदक्ष अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी एक महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय घेत अनुसूचित क्षेत्रातील 220 'शिक्षण सेवक' पदांच्या नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभा अक्कलकुवा -धडगाव तालुक्याचे आमदार आमश्या पाडवी, ॲड योगेश वि. जायभाये (उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ संभाजीनगर, नागपूर) गणेश पराडके शिक्षण सभापती जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सहकार्य, मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पाठपुरावा करीत असताना जिल्हा परिषद नंदुरबार येथे आंदोलन करण्यात आले होते. पार्श्वभूमी व शासन निर्देश आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्र आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022) मधील गुणांच्या आधारे पेसा क्षेत्रातील पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली. शासन निर्णय 19 फेब्रुवारी 2026 व शालेय शिक्षण विभागाकडील 17 जुलै 2026 च्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्हा परिषदेतंर्गत मानधन तत्त्वावर पात्र उमेदवारांना 'शिक्षण सेवक' म्हणून तीन वर्षांच्या मानधनावर नियुक्त्या देण्यात येत आहेत.
नियुक्तीच्या प्रमुख अटी व प्रशासकीय नियम मानधन व सेवाकाळ शिक्षण सेवक पदावर तीन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर, नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती मिळण्यास पात्र ठरतील. हा कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांचा राहील.
पेसाक्षेत्र व बदली नियम सदर नियुक्ती स्थानिक पेसा क्षेत्रात असल्याने ग्रामविकास विभागाने ठरविलेले जिल्हांतर्गत बदली व सेवाविषयक धोरण बंधनकारक असेल. नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाण्यास नियम प्रतिबंधित असून, यासाठी रितसर राजीनामा देऊन पुन्हा पवित्र पोर्टलद्वारे नियमानुसार प्रक्रिया पार पडली. कागदपत्र पडताळणी जात प्रमाणपत्र, जात वैधता, टीईटी/टीएआयटी पात्रता, शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत पडताळणी करण्यात आली. कोणतीही माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द केली जाईल. हजर होण्याचा कालावधी उमेदवारांना नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी सेवेत रुजू होणे अनिवार्य आहे. मुदतीत न आल्यास नेमणूक रद्द समजली जाईल. इतर अटी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, संगणक अर्हता आणि मुख्यालयी वास्तव्य करण्याचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. असेही नियुक्ती आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासकीय अधिकारी यांना संघटनेच्या वतीने अभिनंदन शुभेच्छा देण्यात आल्या. महत्त्वाचा निर्णय तडीस नेल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भा.प्र.से.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी क्रांती आरसूड, उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारीश्रीमती वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी(योजना) डॉ. युनुस पठाण, आस्थापना विभाग शिक्षण अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत व जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी विशेष अभिनंदन केले आहे. मानधन तत्वावर काम करणारे शिक्षक बांधवांनी गुणवत्ता पात्रता यादीतील मानधन कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन, कायमची नियुक्ती द्यावी, आणि सेवेमध्ये सामावून घ्यावे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून दाद मिळत नसल्यामुळे पुढील न्याय हक्कासाठी जि.प. नंदुरबार येथे समक्ष हजर राहून विनंती तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटनेमार्फत न्यायालयात, वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करण्यात आला होता त्या पाठपुरावाला यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वाडी -वस्ती आणि पाड्यांवरील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार असल्याने शिक्षक बांधव व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.



