*सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे मार्गावर अलिकडेच सुरु करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सौंदळ रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी थांबविण्यात यावी असा ठराव ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला याबाबतचे निवेदन सौंदळ ग्रामपंचायतीच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे. सौंदळ रेल्वे स्थानक हे राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील मुख्य केंद्र असून या परिसरातील सुमारे 75 ते 80 गावातील प्रवासी वर्ग या स्थानकावर अवलंबून आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा भागातील काही गावे या रेल्वे स्थानकाचा वापर करतात. सद्यस्थितीत या रेल्वे स्थानकावर सावंतवाडी दिवा या गाडी व्यतिरिक्त कोणत्याही एक्स्प्रेस गाडीला थांबा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णांना रत्नागिरी किंवा इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी दूरच्या रेल्वे स्थानकावर जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा व श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे
सध्या नवीन सुरु होणाऱ्या सीएसएमटी सावंतवाडी एक्स्प्रेसला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.तसेच कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास या ठरावात व्यक्त करण्यात आला आहे.हा ठराव माजी सरपंच संजय दत्ताराम मांजरे यांनी मांडला तर जगदीश पर्शुराम राणे यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या स्वाक्षरीने हा ठराव मंजूरीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांची भेट घेऊनही निवेदन देण्यात आले आहे.



