ताजा खबरे:
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*कुणबी समाजोन्नती संघ,शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका दापोली यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि यशस्वी उद्योजकांचा सन्मान सोहळा 23 ऑगस्ट 2026 रोजी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाखाध्यक्ष विजय नायनाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नुकतीच सीएची पदवी प्राप्त करणारा पोफळवणे गावचा सुपुत्र तेजस सुरेश नाचरे, वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी एमबीबीएस पदवी संपादन करून डॉक्टर झालेला टेटवली गावचा सुपुत्र आदित्य विजय नायनाक, मानसोपचारतज्ज्ञ वेदिका सुनील कांगणे, महाराष्ट्र मुलांच्या लंगडी संघाचा कर्णधार वेदांत सुनील कांगणे तसेच महाराष्ट्र कबड्डी संघातील खेळाडू अंश अंकुश कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी शिक्षणाबरोबरच आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकतेला चालना मिळणे आवश्यक आहे. समाजात अधिकाधिक उद्योजक निर्माण झाले, तर समाज आर्थिकदृष्ट्याही सक्षम होईल, या उद्देशाने तालुक्यातील यशस्वी उद्योजकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण, मेहनत, सातत्य, आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधतानाच समाजाच्या विकासातही सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
या कार्यक्रमाला कुणबी सहकारी बँकेचे संचालक संतोष चौगुले, कुणबी समाजोन्नती संघाचे सहसचिव प्रमोद खेराडे, कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष संतोष कांबळे, सचिव सचिन रामाणे, खजिनदार पांडुरंग दोडेकर, सुप्रिया ट्रॅव्हल्सचे बाळकृष्ण म्हसकर, शाखेचे उपाध्यक्ष सुरेश गावडे, रमेश काटकर, खजिनदार अनुज चव्हाण, शाखेचे ज्येष्ठ सदस्य भागोजी निकम, पांडुरंग जांभळे, दापोली कुणबी पतपेढीचे संचालक महेंद्र जाधव, दापोली शाखेचे माजी उपाध्यक्ष गोविंद पालटे, शाखेचे सदस्य चंद्रकांत चोगले, लक्ष्मण हरावडे, विवाह मंडळाचे सदस्य रविंद्र बैकर, उद्योजक सुरेश माने, नारायण काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखेचे सचिव नरेश घरटकर, सहसचिव निलेश पानकर, सुनील कानसे, सुनील धोपट, सचिन चिपटे, उपाध्यक्ष चेतन नामोळे, ॲड. जयकुमार गौरत,विजयकुमार गौरत, युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष पांढरे, सचिव तेजस पवार, सहसचिव सूरज गोरीवले, उपाध्यक्ष नरेश गावडे आणि संकेत पाते यांनी विशेष परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्या भविष्यातील यशासाठी प्रेरणादायी ठरतो. अशा उपक्रमांमुळे समाजातील नव्या पिढीला शिक्षण, कर्तृत्व आणि यशाची नवी दिशा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पानकर आणि संतोष पांढरे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
August, 25 2026
*सीएस‌एमटी ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या ग्रामसभेत ठराव*
August, 25 2026
*कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि उद्योजकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
August, 25 2026
*शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा संपन्न*
August, 25 2026
*नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी 'भटके विमुक्त दिवस' साजरा होणार*
August, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज