*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 23 ऑगस्टला शहादा दौऱ्यावर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) कॅप्टन आशिष आनंद दामले हे रविवार, दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते शहादा येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी 10:30 वाजता शहादा येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10:40 वाजता शिवतीर्थ चौक (हॉटेल नंदनवन जवळ) येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सकल ब्राह्मण समाज, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित बाईक रॅलीस उपस्थिती. ही रॅली शिवतीर्थ चौक येथून निघून स्टेट बँक ऑफ इंडिया, स्वामी समर्थ केंद्र मार्गे 'मीरा प्रताप लॉन्स' येथे समाप्त होईल. यानंतर सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 या वेळेत मीरा प्रताप लॉन्स, शहादा येथे आयोजित ‘भगवान परशुराम समाज संवाद यात्रा’ या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी 3 वाजता ते गांधीनगर, शहादा येथील नगरपरिषद शाळेजवळ असलेल्या ‘व्हॉलंटरी शैक्षणिक संकुलास’ सदिच्छा भेट देणार आहेत. यानंतर दुपारी 3:10 वाजता ते बदलापूरकडे रवाना होतील.



