*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
शहादा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहादा शहरात निर्भयता व मानवतेची शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ‘निर्धार वॉक’ला प्रारंभ झाला. विविध संस्था व संघटनांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या या निर्भय रॅलीत परिवर्तनवादी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव विनायक सावळे यांनी प्रास्ताविकातून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागील वैचारिक भूमिका, तसेच विवेकवादी, मानवतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची समाजाला असलेली गरज याबाबत भूमिका मांडली. त्यानंतर परिवर्तनवादी गीतांच्या सादरीकरणासह निर्भय रॅलीला सुरुवात झाली. ‘लढेंगे जितेंगे’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, ‘फुले-शाहू-आंबेडकरांनी सारे दाभोळकर’ अशा घोषणांनी रॅलीत उत्साह निर्माण झाला. रॅलीदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे उपस्थित नागरिकांनी हिंसेचा विरोध, मानवतेचे कल्याण आणि अहिंसेचे समर्थन करण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच आयुष्यभर मानवतावादी व विवेकवादी विचारांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला. या निर्भय वॉक मध्ये शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. बी. डी. पटेल, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव मुकेश कापुरे, राज्य कार्यवाह रवींद्र पाटील, ज्येष्ठ लेखिका डॉ. अलका कुलकर्णी, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. आर. टी. पटेल, साने गुरुजी मंडळाचे मानक पटेल, पंचायत समितीच्या माजी सभापती वनिता पटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, जयंट्स ग्रुपचे कैलास भावसार, सय्यद शैक्षणिक संस्थेचे लियाकत अली सय्यद, लोकशाही जागर समितीचे चुनीलाल ब्राह्मणे, सलोखा समितीचे दादाभाई पिंपळे, जनार्थ आदिवासी विकास संस्थेच्या रंजना कान्हेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे शाखाध्यक्ष ॲड. गोविंद पाटील, उपाध्यक्ष प्रा. दत्ता वाघ, माकपचे जिल्हा सचिव कॉ. सुनील गायकवाड, फुले-आंबेडकर स्टडी सर्कलचे सुनील पाटोळे, विष्णू जोंधळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सावन ठाकरे, डॉ. स्मिता जैन, इन्कलाब ग्रुपच्या भारती पवार, राज्य प्रधान सचिव विनायक सावळे, कार्यवाह रवींद्र पाटील, जिल्हा सचिव मुकेश कापुरे, शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव प्रवीण महिरे, श्रीकांत बाविस्कर, प्रदीप केदारे, आरिफ मणियार, हृदयेश चव्हाण, सुभाष भुजबळ यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजात विवेक, विज्ञाननिष्ठा, निर्भयता आणि मानवतावादी विचार रुजविण्यासाठी केलेल्या कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी शाखाध्यक्ष डॉ. मालविका कुलकर्णी यांनी आभार मानले.



