*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
राजापूर(प्रतिनिधी):-रत्नागिरी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत योगा आर्टिस्टिक पेअर प्रकारात ओझर नं 1 शाळेच्या दुर्वा मंगेश गुरव आणि पल्लवी मालपेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धा ही खेड येथे पार पडली असून या स्पर्धेत कु. वैदेही नवलू, श्रूती पळसमकर, साहील गुरव, दुर्वा रेगे, पल्लवी मालपेकर, दुर्वा गुरव, आझम नेवरेकर आणि स्नेहल पळसमकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दुर्वा गुरव आणि पल्लवी मालपेकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत शाळेचे व गावाचे नाव जिल्हा स्तरावर उज्ज्वल केले आहे. या सर्व स्पर्धेसाठी मार्गदर्शक, प्रशिक्षक युवराज मोरे यांनी विशेष मेहनत घेतली तर बनसोडे, गायकवाड व ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलेले आहे. या निमित्ताने या सर्व मार्गदर्शक, प्रशिक्षक यांना मनापासून आभार मानण्यात आले.