ताजा खबरे:
*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*

  • Share:

*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसह शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केंद्रस्तरावरील शैक्षणिक कामकाज अधिक सक्षम व सुसूत्र करण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे जिल्हास्तरीय क्षमता आधारित शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्यान प्रकाश फाउंडेशन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली. शहादा व तळोदा तालुक्यातील समूह साधन केंद्र समन्वयक तसेच केंद्र संसाधन गटातील सीआरजी सदस्य या कार्यशाळेस उपस्थित होते. उर्वरित अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, नंदुरबार तालुक्यातील प्रशिक्षण संपन्न होणार आहे. केंद्रस्तरीय शैक्षणिक नियोजन, क्षमता -आधारित शिक्षण, केंद्र संसाधन गटाचे कार्य, शिक्षण परिषदेचे प्रभावी नियोजन आणि शैक्षणिक प्रक्रियेत समाजाचा सहभाग या विषयांवर कार्यशाळेत ग्यान प्रकाश फाउंडेशनचे राज्य समन्वयक मधुकर माने यांनी मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र संसाधन गट हा केंद्रप्रमुखांना शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सहाय्य करणारा महत्त्वपूर्ण गट असून, भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि आयसीटी या विषयांतील उपक्रमशील व विषयतज्ज्ञ शिक्षकांचा त्यात समावेश असतो. शिक्षकांच्या शैक्षणिक गरजा ओळखणे, नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण करणे, शाळांना आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन करणे तसेच शिक्षण परिषद प्रक्रियेत सुलभकाची भूमिका बजावणे, या सीआरजी च्या प्रमुख जबाबदाऱ्यांवर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
यावेळी क्षमता -आधारित शिक्षण, निपुण भारत व निपुण महाराष्ट्र, पायाभूत चाचणीचे विश्लेषण, विद्यार्थी प्रगतीचा आढावा, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, पालक सहभाग, वर्ग नियोजन, शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका आणि शैक्षणिक ग्रामसभा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्राच्या शैक्षणिक गरजांनुसार नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र समन्वयक व सीआरजी सदस्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा परिषद नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती आरसूड यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दिपक साबळे, ग्यान प्रकाश फाउंडेशन राज्य समन्वयक मधुकर माने, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार, अधिव्याख्याता प्रदीप पाटील, ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक क्रांती सोनवणे, अधिव्याख्याता विनोद लवांडे, ग्यान प्रकाश फाउंडेशनचे संदीप जावरे, प्रकाश लांबोळे आदींनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित असलेल्या समाज सहभागाच्या अनुषंगाने पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शैक्षणिक यंत्रणा यांच्यात समन्वय वाढविण्याची आवश्यकता यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या अधिव्याख्याता प्रतिभा भावसार यांनी व्यक्त करण्यात आली. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढविणे, शाळांच्या शैक्षणिक गरजा ओळखणे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे, यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते, डायट अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांनी  मार्गदर्शन करण्यात आले.
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या यशस्वीतेसाठी ग्यान प्रकाश फाउंडेशन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग, नंदुरबार यांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कार्यरत आहे. या कार्यशाळेमुळे केंद्र समन्वयक व सीआरजी सदस्यांना क्षमता -आधारित शिक्षणाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी दिशा मिळाली असून, त्याचा लाभ केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी होणार आहे. असेही मत सीआरजी सदस्य गोपाल गावीत यांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त शहाद्यात निर्भयता व मानवतेची शपथ*
August, 20 2026
*ग्यान प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून डायट नंदुरबारमध्ये क्षमता आधारित शिक्षणाला चालना*
August, 20 2026
*एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळवल्याशिवाय माघार नाही- विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेचा निर्धार*
August, 20 2026
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
August, 20 2026
*रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत ओझर नं 1 शाळेची दुर्वा गुरव व पल्लवी मालपेकर यांचे उज्वल यश*
August, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज