ताजा खबरे:
*आवास प्लस 2024 च्या मसुदा यादीत पात्र लाभार्थी वंचित?भमाणे ग्रामपंचायतीतील अनेक गावांतील लाभार्थ्यांची नावे नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप*
*सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर, हा तर सत्याचा विजय-सनातन संस्था*
*महिला व मुलींच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीसाठी नंदुरबार पोलिसांची सुधारित दक्षता समितीची स्थापना*
*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 8 अधिकाऱ्यांसह अंमलदारांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक*
*21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर, हा तर सत्याचा विजय-सनातन संस्था*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर, हा तर सत्याचा विजय-सनातन संस्था*

  • Share:

*सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर, हा तर सत्याचा विजय-सनातन संस्था*
मुंबई(प्रतिनिधी):-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ सचिन अंदुरे यांना तपासातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात अंदुरे यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. अंदुरे यांच्या या याचिकेला विरोध करत दाभोलकर परिवाराने ‘सचिन अंदुरे यांना जामीन देऊ नये’, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावत अंदुरे यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे सनातन संस्थेवर आणि हिंदुत्वनिष्ठांवर खोटे आरोप करून त्यांना गोवण्याचे दाभोलकर कुटुंबियांचे षड्यंत्र आता उघडे पडले आहे; तसेच तपास यंत्रणांचा फोलपणाही उघड झाला असून हा सत्याचा मोठा विजय आहे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी मांडली आहे. उच्च न्यायालयामध्ये सचिन अंदुरे यांच्या जामिनासाठी युक्तिवाद करतांना ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान यांनी पुराव्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले. सीबीआयसारख्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने या प्रकरणात कोणतीही ‘ओळख परेड’ घेतली नव्हती. काहींनी सचिन अंदुरे यांना गोळ्या झाडतांना पाहिल्याचा दावा केला, तर काहींनी ते घटनास्थळी नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात मोठी तफावत होती. या, तसेच तपासातील अशा प्रकारच्या अनेक त्रुटी अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. हे सर्व लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन मंजूर केला व शिक्षेला स्थगिती दिली आहे. यापूर्वी याच प्रकरणात एप्रिल महिन्यात हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता. या विषयी वर्तक पुढे म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येनंतर कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ वैचारिक द्वेषातून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात आले. दाभोलकर कुटुंबियांनी ‘विशिष्ट विचारसरणीचा आवाज दाबण्याचा कट’ असल्याचा कांगावा करत सनातनवर बेछूट आरोप केले; परंतु विशेष न्यायालयाने यापूर्वीच डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि शविक्रम भावे या तीन हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली होती. यामुळे दाभोलकर कुटुंबाचा न्यायालयात सपशेल पराभव झाला आहे. खऱ्या खुन्यांचा शोध घेण्यापेक्षा हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचाच त्यांचा हेतू होता, हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच सचिन अंदुरे यांना अटक झाली तेव्हा त्यांची मुलगी केवळ 6 महिन्यांची होती. आता सचिन अंदुरे आपल्या मुलीला भेटतील तेव्हा ती आठ वर्षांची झाली आहे. सचिन अंदुरे यांना मुलीचे ते बालपण पुन्हा मिळणार नाही. त्यांची मुलगी वडिलांच्या ज्या सहवासाला मुकली, तो सहवास तिला पुन्हा मिळणार नाही. मोठमोठे राजकारणी, पोलीस अधिकारी, सिनेकलावंत यांच्याशी जवळीक असलेल्या कुटुंबासाठी एका निष्पाप हिंदू मुलाचा कसा बळी दिला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन अंदुरे!न्यायालयात अंदुरे यांच्या बाजूने लढा देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्त्या सिद्धविद्या, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्यांच्या सर्व सहयोगी अधिवक्त्यांचे सनातन संस्था मनःपूर्वक आभार व्यक्त करते. अंतिम सुनावणीत हे दोन्ही हिंदुत्वनिष्ठ युवक निर्दोष मुक्त होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असेही वर्तक यांनी म्हटले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आवास प्लस 2024 च्या मसुदा यादीत पात्र लाभार्थी वंचित?भमाणे ग्रामपंचायतीतील अनेक गावांतील लाभार्थ्यांची नावे नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप*
August, 18 2026
*सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर, हा तर सत्याचा विजय-सनातन संस्था*
August, 18 2026
*महिला व मुलींच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीसाठी नंदुरबार पोलिसांची सुधारित दक्षता समितीची स्थापना*
August, 18 2026
*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 8 अधिकाऱ्यांसह अंमलदारांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक*
August, 18 2026
*21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
August, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज