*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 8 अधिकाऱ्यांसह अंमलदारांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 8 अधिकाऱ्यांसह अंमलदारांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक*
*नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 8 अधिकाऱ्यांसह अंमलदारांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांनी बजावलेल्या उल्लेखनीय आणि दीर्घकालीन सेवेची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून त्यांना उत्कृष्ट सेवा पदक व अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट सेवा पदक
उत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये पोलिस अधीक्षक अश्विनी संतोष सानप, पोलिस निरीक्षक निलेश रविंद्र देसले, पोलिस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील, पोलिस हवालदार बापू निंबा वाघ (ब.नं. 990), पोलिस हवालदार भटू शांतिलाल धनगर (ब.नं. 1011) आणि पोलिस हवालदार मोहन पांडुरंग हमडे (ब.नं. 1147) यांचा समावेश आहे. अतिउत्कृष्ट सेवा पदक
अतिउत्कृष्ट सेवा पदकाने पोलिस उपअधीक्षक निवृत्ती गंगाराम पवार, आर्थिक गुन्हे शाखा, नंदुरबार तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक बाळकृष्ण गोरे यांचा गौरव करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील या अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेला मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



