*21 ऑगस्ट रोजी भव्य'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन, विविध नामांकित कंपन्यांमध्ये 80 हून अधिक पदांवर होणार भरती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*21 ऑगस्ट रोजी भव्य'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन, विविध नामांकित कंपन्यांमध्ये 80 हून अधिक पदांवर होणार भरती*
*21 ऑगस्ट रोजी भव्य'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन, विविध नामांकित कंपन्यांमध्ये 80 हून अधिक पदांवर होणार भरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी भव्य ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ (रोजगार मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता शासकीय आय.टी.आय., नंदुरबार येथे पार पडेल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने: आय. टी.एम. एज्युकेशन ट्रेनिंग प्रा. लि. (नंदुरबार) आकाश ऑटोमोटिव्ह (धुळे) अक्षय किया (नंदुरबार)
सहयोग मल्टीस्टेट को-ऑप. बँक लि. (नंदुरबार)
या नामांकित कंपन्यांमधील विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक अशा 80 हून अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त वाघ यांनी केले आहे.



