*गरीब व गरजू विद्यार्थ्यांना से.नि.अध्यापक एस.जे.पाटील यांच्याकडून देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गुणवंतांना रोख पारितोषिक वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गरीब व गरजू विद्यार्थ्यांना से.नि.अध्यापक एस.जे.पाटील यांच्याकडून देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गुणवंतांना रोख पारितोषिक वितरण*
*गरीब व गरजू विद्यार्थ्यांना से.नि.अध्यापक एस.जे.पाटील यांच्याकडून देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गुणवंतांना रोख पारितोषिक वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे स्वातंत्र्यदिनी एस.जे.पाटील से.नि.अध्यापक, जिजामाता कन्या विद्यालय,धुळे यांच्या हस्ते आपल्या जन्मभूमी विखरण येथे इ.दहावी बोर्ड परीक्षेत केंद्रात व विद्यालयात प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कै.आईंच्या नावाने 'रेशम पुरस्कार' वितरण करण्यात आले. कोरीट केंद्रातील प्रथम सुवर्णा दिगंबर पाटील, द्वितीय मानसी महेश पाटील तृतीय देवर्षी काशिनाथ पाटील या विद्यार्थ्यांना रोख रक्कम तर विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावातील एस.जी. पाटील यांचे प्रतिनिधी अशोक साहेबराव पाटील, साहेबराव मंगा पाटील, डॉ.प्रकाश राजाराम पाटील व मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपशिक्षक वाय.डी.बागुल यांनी दाते एस. जी. पाटील यांच्या दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या दातृत्वाबद्दल व यंदा त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांविषयी तळमळीबाबत आपल्या शब्दात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एस.बेडसे तर आभार एस.एच. गायकवाड यांनी मानले.