*जि.प.शाळा ताम्हाणे नं 2 च्या अपेक्षा थोलबरेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.शाळा ताम्हाणे नं 2 च्या अपेक्षा थोलबरेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी*
*जि.प.शाळा ताम्हाणे नं 2 च्या अपेक्षा थोलबरेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ताम्हाणे नं. 2, पहिलीवाडी येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अपेक्षा महादेव थोलबरे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अपेक्षाने राष्ट्रीय ग्रामीण विभागात 10 वा क्रमांक मिळवत आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अपेक्षाच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष चव्हाण व शाळेतील शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. अत्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. भविष्यातही अपेक्षाने शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या. “ग्रामीण भागातूनही गुणवत्तेची उंच भरारी घेता येते, हे अपेक्षाच्या यशाने सिद्ध केले आहे,” अशी भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अपेक्षाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.



