*डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 80 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा,देशभक्ती, लेझीम, भाषणे आणि गुणवंतांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 80 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा,देशभक्ती, लेझीम, भाषणे आणि गुणवंतांचा सन्मान*
*डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 80 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा,देशभक्ती, लेझीम, भाषणे आणि गुणवंतांचा सन्मान*
साक्री(प्रतिनिधी):-भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय, मैंदाणे येथे देशभक्तीच्या भावनेने परिसर दुमदुमून गेला होता. विद्यालय व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.ध्वजारोहणाने झाली सुरुवात
सकाळी 7:45 वाजता महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था पिंपळनेरचे संचालक व्ही. बी. सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मानवंदनेने आणि बँडच्या गजराने संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. ध्वजारोहणानंतर सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत, वंदे मातरम, ध्वजगीत व राज्यगीत गायले. मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान अध्यक्ष गणेश गावित, महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे संचालक मिलिंद भाऊराव महाजन, मुख्याध्यापक राजेंद्र विठ्ठल क्षिरसागर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक राजेंद्र क्षिरसागर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, "80 वर्षांपूर्वी मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी शिक्षण, संस्कार आणि देशप्रेम आवश्यक आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे 'राष्ट्रप्रथम' हे तत्व आम्ही विद्यार्थ्यांना देतो." सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
यावेळी इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम, देशभक्तीपर गीते आणि भाषण स्पर्धांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे यांनी आपल्या भाषणात सीमेवरील जवानांच्या त्यागा विषयी माहिती दिली आणि रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यावेळी अग्नि वीर मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी प्रथम क्रमांक पडवाल प्रवीण अशोक 84.50,
द्वितीय क्रमांक, साबळे अविनाश सुरेश 80.80
तृतीय क्रमांक राठोड नंदिनी गणेश 80.80 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. समारोप
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश घरटे यांनी केले. आभार प्रदर्शन धनंजय पाटील यांनी मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागुल, देसले, सोनवणे, श्रीमती चव्हाण, श्रीमती देवरे, अशोक चौरे, राजेंद्र कोतकर, राकेश शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



