*माती समृद्ध, शेतकरी सक्षम’! सुझलॉन व संजीवन ऑर्गनायझेशनच्या पुढाकारातून, 35 गावांतील 300 शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत उपक्रमाला सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माती समृद्ध, शेतकरी सक्षम’! सुझलॉन व संजीवन ऑर्गनायझेशनच्या पुढाकारातून, 35 गावांतील 300 शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत उपक्रमाला सुरुवात*
*माती समृद्ध, शेतकरी सक्षम’! सुझलॉन व संजीवन ऑर्गनायझेशनच्या पुढाकारातून, 35 गावांतील 300 शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत उपक्रमाला सुरुवात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सुझलॉन कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत व संजीवन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भोने व वासदरे गावातील शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीसाठी बॅगचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे तसेच स्वतःच्या शेतावर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत भोने गावातील 15 आणि वासदरे गावातील 15 अशा एकूण 30 शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीच्या बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार असून साक्री व नंदुरबार तालुक्यातील एकूण 35 गावांमधील सुमारे 300 शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व मार्गदर्शन वेळोवेळी देण्यात येणार आहे. गांडूळ खत निर्मितीची योग्य पद्धत, त्यासाठी आवश्यक साहित्य, खत तयार करण्याची प्रक्रिया, त्याचा शेतीमध्ये वापर तसेच सेंद्रिय खतामुळे होणारे आर्थिक व पर्यावरणीय फायदे याबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमास दोन्ही गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच सुझलॉन कंपनीचे आकाश हिवरखेडे आणि संजीवन ऑर्गनायझेशनचे सागर पकाले, शुभम पवार, सुशील गावित, अंकिता वसावे व कीर्ती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे शेतीतील महत्त्व आणि सेंद्रिय खताच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत गांडूळ खत निर्मितीचा उपक्रम आपल्या शेतात राबविण्याची तयारी दर्शवली.
सुझलॉन कंपनीच्या CSR सहकार्याने आणि संजीवन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन, रासायनिक खतांचा कमी वापर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. 35 गावांतील सुमारे 300 शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



