*21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
*21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’चे आयोजन, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील जलक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि भूजल पुनर्भरण या संकल्पनांना लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने 21 ऑगस्ट 2026 रोजी भव्य ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’ (Walk for Water) चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या उपक्रमाची मुख्य संकल्पना (Theme) ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अशी असून, "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा" या घोषवाक्यासह ही वॉकॅथॉन संपन्न होणार आहे. वॉकॅथॉनचा मार्ग व वेळापत्रक: मार्ग: जी.टी.पी कॉलेज ग्राउंड (प्रारंभ) अंधारे स्टॉप,नेहरू चौक, महाराणा प्रताप चौक, मार्केट रोड मार्गे खोडाईमाता मंदीर, परत जीटीपी कॉलेज ग्राउंड येथे सांगता.
वेळापत्रक: सकाळी 6:00 वा. कार्यक्रम स्थळी आगमन सकाळी 6:15 वा. वॉर्म- अप सकाळी 6:45 वा. मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ सकाळी 7:00 वा. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला प्रारंभ
सकाळी 8 वा. वॉकेथॉनचा समारोप सकाळी 8:30 वा. पारितोषिक/प्रमाणपत्र वितरण व आभार प्रदर्शन
सहभागासाठी आवाहन व नोंदणी: वयाची 15 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांना या जलचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागासाठी क्यूआर (QR) आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार असून प्रथम दहा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या उपक्रमाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत, असेही मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



