*महिला व मुलींच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीसाठी नंदुरबार पोलिसांची सुधारित दक्षता समितीची स्थापना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिला व मुलींच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीसाठी नंदुरबार पोलिसांची सुधारित दक्षता समितीची स्थापना*
*महिला व मुलींच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीसाठी नंदुरबार पोलिसांची सुधारित दक्षता समितीची स्थापना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती. अश्विनी सानप यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट 2026 रोजी नवीन महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेला अधिक प्रभावी बळ देण्यासाठी, महिलांच्या तक्रारीची विनाबिलंब व संवेदनशील पद्धतीने निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर नविन महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीत खालील नमुद विविध क्षेत्रातील महिला प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. महिला समितीतील सदस्यांची नावे
डॉ. सौ. सपना अग्रवाल डॉक्टर नंदुरबार शहर पोलीस ठाणे, अॅड. सिमा खत्री वकील उपनगर पोलीस ठाणे, श्रीमती. सुजाता रमाकांत साळवे एन.जी.ओ नंदुरबार शहर पोलिस ठाणे,
श्रीमती. प्रतिक्षा समाधान वाघ
एन.जी.ओ नंदुरबार तालुका पोलिस ठाणे,
श्रीमती. राजश्री मोहन अहिरराव
सेवानिवृत्त प्राचार्य
नंदुरबार शहर पोलिस ठाणे
श्रीमती, सिमा श्रीराम मोडक
मुख्याध्यापिका
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे,
श्रीमती. नुतनवर्षा राजेश वळवी
मुख्याध्यापिका
उपनगर पोलिस ठाणे, श्रीमती. संगिता तुकाराम सोनवणे माजी नगरसेविका नंदुरबार शहर पोलिस ठाणे,
कु. सविता गुणवंत पवार विद्यार्थीनी, कु. लक्ष्मी राज्या वसावे विद्यार्थीनी, कु. सावित्री भाईदास खर्डे
विद्यार्थीनी सदर बैठकीत महिला व मुलींनी कोणत्याही प्रकारची अडचण, छळ किंवा इतर तक्रारी असल्यास ती दडपून न ठेवता नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा व नंदुरबार जिल्हा सुरक्षित व भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस दलास सहकार्य करावे अस आव्हान करण्यात आले.



