*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
*सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्तीची मुख्यमंत्री, पालकमंत्रीकडे हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला सहाय्यक धर्मदाय आयुक्त हे प्रमुख अधिकारीचे पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तरी नंदुरबार जिल्हासाठी लवकरात लवकर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची स्वतंत्र नियुक्ती करावी या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना मेलद्वारे तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समक्ष भेटून देण्यात आले. हिंदु सेवा सहाय्य समितीची डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, जगदीश मराठे, शाम कासार, पृथ्वीसिंह राजपूत यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, विधी व न्याय विभागाकडून जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची स्थापना वर्ष 2009 मध्ये झाली. 2009 ते 2022 पर्यंत नंदुरबार जिल्ह्यासाठी सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून स्वतंत्र पद नियुक्ती होती परंतु नोव्हेंबर 2022 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंत त्यांचा जागी स्वतंत्र सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार धुळे जिल्ह्यातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त दर मंगळवारी येऊन चालवित आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त हे रिक्त पद असल्यामुळे ट्रस्टच्या नोंदी, सुनावण्या आणि कायदेशीर प्रक्रियेला उशीर होत आहे. आयुक्त कार्यालयात विश्वस्त बदलाचे अर्ज आणि इतर कायदेशीर खटले प्रलंबित आहेत. रिक्त पदांमुळे सार्वजनिक ट्रस्टमधील कामकाजावर आणि सुनावणीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र अधिकारी यांची नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करून अधिकारी यांची नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन दिले.



