*बळीराजाच्या लेकीचा गुणवत्तेचा झेंडा; सुवर्णा पाटील व तिच्या पालकांच्या हस्ते देवरे विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बळीराजाच्या लेकीचा गुणवत्तेचा झेंडा; सुवर्णा पाटील व तिच्या पालकांच्या हस्ते देवरे विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण*
*बळीराजाच्या लेकीचा गुणवत्तेचा झेंडा; सुवर्णा पाटील व तिच्या पालकांच्या हस्ते देवरे विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवरे यांच्या
दूरदृष्टीतून आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेतून एक प्रेरणादायी परंपरा 36 वर्षापासून सुरु करण्यातआली.आजही अखंडपणे सुरु आहे.इयत्ता 10
वीच्या परीक्षेत
कोरीट केंद्रात प्रथम क्रमांक
मिळविणाऱ्या
गुणवंत विद्यार्थालास्वातंत्र्यदिनाच्या पावन प्रसंगी
ध्वजारोहनाचा
मान देण्यात येत आहे. हा केवळ
सम्मान नसून,
विद्यार्थ्याच्या
मेहनतीचा,
जिद्दीचा आणि
गुणवत्तेचा गौरव आहे, रुजविलेली ही प्रेरणादायी
परंपरा आजही
विद्याथ्यार्थ्यांच्या
मनात स्वप्ने, ध्येय आणि
यशाची नवी उमेद निर्माण करत आहेआणि यासंस्थेच्या परंपरेनुसार सन 2025-26 या
शैक्षणिक वर्षात
इयत्ता 10 वी परिक्षेत कोरीट केंद्रात 95 टक्के गुण
मिळवत प्रथम
क्रमांक मिळवत बळीराजाची लेक सूवर्णा दिगंबर
पाटील तसेच महाराष्ट्र राज्य
ऊर्जा विकास अभिकरण
(महाउर्जा) विभाग पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक
मिळवुन 75000
रुपये रोख
बक्षीसाची
मानकरी ठरली.
ध्वजारोहनाचा
मान सुवर्णा व
तिचे पालक
दिगंबर मुरलीधर पाटील,आई.प्रतिभा
दिगंबर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण
करण्यात आले.
तसेच स्काऊट गाईड ध्वजारोहण मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांचे हस्ते करण्यात आले.
“तंबाखू मुक्तीची शपथ ","नशा मुक्त शपथ" व आगामी
फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेसाठी कॉपीमुक्त
अभियाना अंतर्गत शपथ विद्यार्थ्यांनी घेतलीस्वातंत्र्य
दिनानिमित्त
देशभक्तीपर गीतावर कवयात संचालन, गीतगायन, लेझीम, देशभक्तीपर भाषण, नृत्य, लेक वाचवा लेक शिकवा, हुंडाबळी, दारूबंदी, स्वच्छता अभियान, पर्यावरण, मानवी मनोरे आदी विषयांवर समाज प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे जि.प. शाळा विखरण येथे आयोजन करण्यात आले. सुवर्णा पाटील हिच्या पालकांनी
विद्यालयास 21000 रुपये रोख देणगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्याकडे सुपूर्द केली.प्रास्ताविक डॉ. आर.आर. बागुल, सूत्रसंचालन एम. एस. मराठे तर आभारप्रदर्शन सी.व्ही.नांद्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.डी.नेरकर,वाय. डी.बागुल,ए.एस.बेडसे,एस.एच. गायकवाड,व्ही.बी. अहिरे,एस.जी. पाटील,एच.एम.खैरनारआदींनी संयोजन व परिश्रम *बळीराजाच्या लेकीचा गुणवत्तेचा झेंडा; सुवर्णा पाटील व तिच्या पालकांच्या हस्ते देवरे विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण*
विखरण :- श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री.आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.आप्पासाहेब देवरे यांच्या दूरदृष्टीतूनआणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेतून एक प्रेरणादायी परंपरा 36 वर्षापासून सुरु करण्यातआली.आजही अखंडपणे सुरु आहे.इयत्ता 10 वी च्या परीक्षेत कोरीट केंद्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थाला स्वातंत्र्यदिनाच्या पावन प्रसंगी ध्वजारोहनाचा मान देण्यात येत आहे.हा केवळ सम्मान नसून,विद्याध्याच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि गुणवत्तेचा गौरव आहे.आप्पासाहेबांनी रुजविलेली ही प्रेरणादायी परंपरा आजही विद्याथ्यार्थ्यांच्या मनात स्वप्ने, ध्येय आणि यशाची नवी उमेद निर्माण करत आहे.आणि यासंस्थेच्या परंपरेनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी परिक्षेत कोरीट केंद्रात 95 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवत बळीराजाची लेक सूवर्णा दिगंबर पाटील तसेच महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) विभाग पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवुन 75000 रुपये रोख बक्षीसाची मानकरी ठरली.ध्वजारोहनाचा मान सुवर्णा व तिचे पालक दिगंबर मुरलीधर पाटील,आई.
प्रतिभा दिगंबर पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्काऊट गाईड ध्वजारोहण मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांचे हस्ते करण्यात आले.
“तंबाखू मुक्तीची शपथ ","नशा मुक्त शपथ" व
आगामी फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर कवयात संचालन, गीतगायन,लेझीम,देशभक्तीपर भाषण,नृत्य,लेक वाचवा लेक शिकवा,हुंडाबळी,दारूबंदी,स्वच्छता अभियान,पर्यावरण, मानवी मनोरे आदी विषयांवर समाज प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे जि.प. शाळा विखरण येथे आयोजन करण्यात आले.सुवर्णा पाटील हिच्या पालकांनी
विद्यालयास 21000 रुपये रोख देणगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्याकडे सुपूर्द केली. प्रास्ताविक डॉ. आर.आर.बागुल, सूत्रसंचालन एम.एस. मराठे तर आभार प्रदर्शन सी.व्ही.नांद्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.डी.नेरकर, वाय डी.बागुल,ए.एस.बेडसे,एस.एच. गायकवाड,व्ही.बी. अहिरे,एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार आदींनी संयोजन व परिश्रम घेतले.



