*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे निधी वितरण प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश. याचिकाकर्ते शेवंति हेमंत ठाकरे, राहणार - धवळीविहीर, तालुका तळोदा, हिने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तसेच माननीय गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामसभा कोष समिती मध्ये योग्यरीत्या निधी वितरण करणे तसेच विनियोगाची परवानगी संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर निर्णय घेण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात सरपंच यांनीही पाठपुरावा केला होता. ग्रामसभा कोष समितीची स्थापना करण्यात आली होती. चुकीच्या पद्धतीने पेसा गाव घोषित होऊन निधी वितरित करण्यात आलेले होते. प्रशासनास ठराव घेऊन खुलासा सादर करण्यात आला होता. बँक खाते गोठविल्याने कामे करताना बंधने येत होती. वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घूगे व न्यायमूर्ती हितेन एस. वेनेगावकर) यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून याचिकाकर्ते यांनी दिलेल्या निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी 60 दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) व एडवोकेट महेश एस. सोनवणे यांनी काम पाहिले.



