*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
*विश्व हिंदू परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन*
तळोदा(प्रतिनिधी):-विश्व हिंदू परिषद स्वामी विवेकानंद साप्ताहिक सत्संग मंडळ, तळोदा यांच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भारत माता पूजन व अखंड भारताची शपथ घेण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कीर्तीकुमार माळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, 1947 साली भारताचे विभाजन झाले. भारत पुन्हा अखंड व्हावा, यासाठी राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवून प्रत्येक भारतीयाने अखंड भारताचा संकल्प करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश चौधरी, विश्व हिंदू परिषद विषय संपर्क जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी केले. डॉ. शांतीलाल पिंपरी, माजी जिल्हा सेवा प्रमुख यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. संजय चावडा व अजय माळी यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले.
यावेळी प्रा. राजाराम राणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारी सदस्य, शिरीष मगरे, साप्ताहिक सत्संग प्रमुख, मोहन रघुवंशी, साप्ताहिक सत्संग सहप्रमुख, मुकेश जैन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, नितीन पाटील, विजय सोनवणे, सतीश सोलंकी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान घेण्यात आले. तसेच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली.



