*तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा-आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा-आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी*
*तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा-आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):- शहरातील वळण रस्त्यांसह विविध प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळोदा बायपास रस्त्यावरील महामार्गाचे काम मंजूर असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांनी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत तसेच तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गा लगत सर्विस रोड तात्काळ सुरू करावा अशी मागणी शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यालगत महामार्ग मंजूर करण्यात आलेला आहे. महामार्ग तयार करण्यासाठी सर्विस रोडची तरतूद निविदेत करण्यात आली आहे.महामार्गाच्या कामाला अजून वेळ लागणार असल्याने सर्विस रोडचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणीही आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केली. सर्विस रोड सुरू झाल्यास शहरातील सुमारे निम्मी वाहतूक या मार्गावर वळविता येईल आणि शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी डांबराचा दर सुमारे 50 हजार रुपये टन होता. आता हाच दर वाढून 75 हजार रुपये टन झाल्याने मंजूर दरात काम करणे ठेकेदारांना परवडत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून वाढीव दराची मागणी केली जात आहे. मात्र, वाढीव दर मंजूर करण्याचे अधिकार नगरपालिकेला नसल्याने याबाबत नगरपालिकेने ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे आ. रघुवंशी यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘स्टार रेट’ मंजूर केल्यास त्यानुसार संबंधित ठेकेदारांना काम करणे शक्य होईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मिरवणूक मार्गांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत आहे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी सांगितले, यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, आदिवासी गौरव दिनाच्या वेळी नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील अनेक खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते बुजविले होते. आता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे. मात्र,खड्डे बुजविण्याच्या कामाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.



