*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत स्पर्धा उत्साहात संपन्न*
*जिल्हा परिषद काथर्दे खुर्द शाळेत हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत स्पर्धा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):- शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक काथर्दे खुर्द शाळेत ‘हरघर तिरंगा’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर चित्रे व तिरंग्याच्या विविध संकल्पना आपल्या कलाकृतींतून साकारल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सादर केलेल्या चित्रांमधून त्यांची सर्जनशीलता आणि देशभक्तीची भावना प्रकर्षाने दिसून आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार सोनवणे तसेच शिक्षक श्रीकांत वसईकर, तुकाराम अलट आणि शारदा कडवे उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
‘हरघर तिरंगा’ सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव रुजविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.



