*एकलव्य विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*
*एकलव्य विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एकलव्य विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संगीत शिक्षक रश्मीकांत त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राज्य गीत व देशभक्तीपर गीतांचे गायन केले. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना गैरमार्गाशी लढा व तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत शपथ दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावदकर, उपाध्यक्ष कुवरसिंग वळवी, सचिव सुहास वसावे, संचालक जयकुमार वसावे, निवृत्त मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, जयदीप नटावदकर, उप मुख्याध्यापक डॉ गिरीश पवार पर्यवेक्षक टिका पाडवी, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुनील खैरनार, बालमंदिरच्या मुख्याध्यापिका रंजना जोशी तसेच निवृत्त कर्मचारी गोपाळ पाडवी, हेमंत खैरनार, किशोर लांबोळे, विलास वाघ, अशोक पाटील, दिलीप तांबोळी, हारून कागझी, कुसुम सोनवणे, गणेश राजपूत, बापू भारती आदि उपस्थित होते.



