*शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यामंदिर पाचलचा कु. आयुष दिपक आयरे राजापूर तालुक्यातून प्रथम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यामंदिर पाचलचा कु. आयुष दिपक आयरे राजापूर तालुक्यातून प्रथम*
*शिष्यवृत्ती परीक्षेत सरस्वती विद्यामंदिर पाचलचा कु. आयुष दिपक आयरे राजापूर तालुक्यातून प्रथम*
पाचल(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने सन 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा ( स्कॉलरशिप) इयत्ता 7 वी मध्ये सरस्वती विद्यामंदिर पाचलने घवघवीत यश संपादन केले आहे, विद्यालयातीत एकूण सात विद्यार्थी जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत चमकले त्यामध्ये कु. आयुष दिपक आयरे याने ग्रामीण गुणवत्ता यादीत राजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक तर रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये बारावा क्रमांक पटकावला आहे तसेच आयुष आयरे याने इयत्ता पाचवीमध्येही गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला होता मंथन परीक्षा, रत्नसिंधू परीक्षा, प्रशाशोध परीक्षा अशा अनेक परीक्षामध्ये त्याने दरवर्षी अव्वल स्थानी येऊन गुणवत्ता यादीत चमकला आहे व आपल्या विद्यालयाचे व पालकांचे नाव उज्वल केले आहे. याशिवाय कुमारी अनघा पळसुले देसाई, असीम सुवार, सानिका बेर्डे , शौर्या जाधव, स्वरा नायकवडे, स्वरा शिर्के हे विद्यार्थी तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत यामध्ये विद्यालयातील मार्गदर्शक. शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या विशेष प्रावीण्याबद्दल सर्व नागरिक तसेच पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पालक, शिक्षक कर्मचारी वृद यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



