*मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉ शैलेश शारदा नीळकंठ मोहिते यांचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉ शैलेश शारदा नीळकंठ मोहिते यांचा गौरव*
*मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉ शैलेश शारदा नीळकंठ मोहिते यांचा गौरव*
मुंबई(प्रतिनिधी):-एक सामान्य कुटुंबातून आलेले डॉ. शैलेश शारदा नीलकंठ मोहिते यांनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने वैद्यकीय क्षेत्रातील एका मोठ्या पदापर्यंत झेप घेतली आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीमधून पुढे आलेला एक मुलगा या घडीला मुंबई पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय विभागाचे संचालक म्हणून काम पाहत आहे, ही बाब प्रचंड लक्षणीय आहे आणि म्हणूनच जीवनात काहीतरी करण्यासाठी धडपणाऱ्या प्रत्येक युवकाने त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा, असे गौरद्वार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी काढले. निमित्त होते डॉ. मोहिते यांच्या सत्कार समारंभाचे. लांजा, राजापूर- संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे डॉ. शैलेश मोहिते यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वाती घोसाळकर, मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार, मंडळाचे तसेच नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 36 वर्षाहून अधिक काळ फॉरेन्सिक मेडिसिन विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोहिते यांनी कूपर आणि नायर हॉस्पिटलच्या डिन पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मोहिते हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि कामातील चोखपणासाठी ओळखले जातात. मात्र प्रशासकीय कामात कडक असले तरी निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी ते नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, त्यामुळे विद्यार्थी आणि डॉक्टरांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत, असा उल्लेख चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मांडला.
सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करत असताना डॉ. मोहिते यांनी शाळेतील एका मुलाच्या धडपडण्याची गोष्ट सांगितली. "मला डॉक्टर व्हायचे होते हे मी आधीपासून ठरवले होते पण फॉरेन्सिक सारख्या किचकट विभागात जाऊन कारकिर्दी घडवण्याचा निर्णय झाला तो अवांतर वाचनामुळे, पोलिसांच्या दक्षता मासिकाचे नियमित वाचन केल्यामुळे मला नवीन दिशा मिळाली. मृत्यूनंतरचे शरीर विच्छेदन योग्य झाल्यास तपासाला गती आणि पुढे न्याय मिळू शकतो. त्यामुळे मी या क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा न्यायासाठी अंकात करणाऱ्या लोकांना मिळून दिला. महापालिकेच्या सेवेत काम करत असताना मला असंख्य डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्यामुळे या क्षेत्रात मी पुढे जाऊ शकलो".
यावेळी डॉ. मोहिते यांनी लांजा, राजापूर- संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ आणि त्या मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार यांच्या गेल्या चार दशकातील कोकणच्या उपेक्षित भागांमधील शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. राहुल चकोर, डॉ. अलका सुभ्रमण्यम, श्रीमती शुभांगी बापट, श्रीमती रीना भाताडे, डॉ.उन्नती देसाई, डॉ. केतकी उल्पात डॉ.राकेश भदाडे, प्रशांत साळुंके,डॉ. ज्योती मोहिते, श्रीमती रोहिणी जंगम, हरीश रावत, शंकर सुर्वे, अजित कदम, संजय केणेकर, श्रीमती अनिता तालेवार, श्रीमती शुभांगी वेंगुर्लेकर, श्रीमती तृप्ती मुंबरकर, अंकिता परब, डॉ. हेतल शहा, श्रीमती नेहा धुरी, विद्याधर सुर्वे, तुलसीदास रावले आदी मान्यवर उपस्थित होते.



