*विलवडे रेल्वे स्थानकावर तीन एक्सप्रेसना थांबा द्या,आमदार किरण सामंत यांना प्रवासी संघटनेचे निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विलवडे रेल्वे स्थानकावर तीन एक्सप्रेसना थांबा द्या,आमदार किरण सामंत यांना प्रवासी संघटनेचे निवेदन*
*विलवडे रेल्वे स्थानकावर तीन एक्सप्रेसना थांबा द्या,आमदार किरण सामंत यांना प्रवासी संघटनेचे निवेदन*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकावर जनशताब्दी, मांडवी आणि नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यांसह अन्य विविध समस्यांविषयी विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्याबरोबर चर्चा केली. आमदार सामंत यांना निवेदन देताना संघटनेचे सल्लागार सुभाष लाड, सुहास खामकर, खजिनदार सदानंद खामकर, अनिल जाधव अमोल कदम, सुनील लोटणकर उपस्थित होते. विलवडे स्टेशन सुमारे 72 गावांशी जोडलेले असून येथून मोठा प्रवासी वर्ग प्रवास करतो. अनेक वर्षापासून संघटनेमार्फत करण्यात येणाऱ्या मागण्यांकडे कोकण रेल्वे बोर्डाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याकडे पदाधिकाऱ्यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले. बैठकीत सल्लागार सुभाष लाड यांनी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या माध्यमातून माचाळ पर्यटन स्थळ, रियासतकार गो.स. सरदेसाई वाडा संवर्धनाबाबत निवेदन सादर केले.