*कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय पाचलमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय पाचलमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा*
*कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय पाचलमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा*
पाचल(प्रतिनिधी):-कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचल ता. राजापूर येथे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे स्वागत कार्यवाह विनायक खानविलकर यांनी केले. सदर प्रसंगी वाचनालयाचे जेष्ठ सभासद व खजिनदार शिरीष सक्रे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ग्रंथपाल दिनाबाबतची माहिती ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमाला कार्यवाह विनायक खानविलकर, विठोबा चव्हाण, लिपिक सौ. काव्या प्रसाद सुतार इत्यादी उपस्थित होते. यानिमित्ताने वाचनालयात पाच दिवसांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व सर्व वाचकांनी घ्यावा असे आवाहन विनायक खानविलकर यांनी केले. ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालयीन कर्मचाऱ्याना वाचनालयाच्या सर्व विश्वस्त मंडळाने शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल काव्या सुतार यांनी सर्वांचे आभार मानले.



