*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन*
*डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-1 ऑगस्ट रोजी नंदुरबार
तालुक्यातील कोकणीपाडा येथे नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गांगुर्डे होते. सुरुवातीला लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी विद्यालयातील एकूण 38 विद्यार्थांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट व सामाजिक कार्यावर आपले वकृत्व सादर केले. 5 वी ते 7 वी पहिला गट व 8 वी ते 10 वी मोठा गट अशी 2 गटात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या हेमलता वळवी, पायल कोकणी, यश वळवी, जागृती गोसावी, आयशा वळवी, राजश्री, दिव्यांजली वळवी यांची निवड करण्यात आली. उपशिक्षिक महेंद्र चौरे, वसंत वळवी, जितेंद्र गिरासे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालतील उपशिक्षिका दिपा वाडेकर व शीतल वसावे, उपशिक्षक जितेश शर्मा यांच्याकडून इयत्ता 5 वी च्या 40 विद्यार्थ्यांना पाणी बॉटल, कंपासपेटी व वह्या देण्यात आल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख महेंद्र चौरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले सूत्रसंचालन दिपा वाडेकर व आभार जितेश शर्मा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.



