*सागबारा येथील देव मोगरा मंदिर परिसरात महाराष्ट्र भवनाला गती,15 कोटींच्या निधीची तरतूद, आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक,आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींच्या सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सागबारा येथील देव मोगरा मंदिर परिसरात महाराष्ट्र भवनाला गती,15 कोटींच्या निधीची तरतूद, आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक,आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींच्या सहभाग*
*सागबारा येथील देव मोगरा मंदिर परिसरात महाराष्ट्र भवनाला गती,15 कोटींच्या निधीची तरतूद, आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक,आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींच्या सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील सागबारा येथील आराध्य दैवत देव मोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र भवन उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक युईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी भवन निर्मितीसाठी विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, जागेची उपलब्धता आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मंदिर परिसरातील जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर हस्तांतरित करण्याबाबत किंवा ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत चर्चा झाली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र भवनाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रस्तावित महाराष्ट्र भवनामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना निवास, विश्रांती, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगतच्या या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाच्या पर्यटन विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सागबारा येथील देव मोगरा माता मंदिर हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्री यात्रेसह वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, भाविकांसाठी निवास व इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर शासनाने या प्रस्तावाची दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे.