*QCI (क्यूसीआय) मूल्यांकनात शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उल्लेखनीय कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*QCI (क्यूसीआय) मूल्यांकनात शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उल्लेखनीय कामगिरी*
*QCI (क्यूसीआय) मूल्यांकनात शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची उल्लेखनीय कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड यांनी गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संस्थेने गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, प्रभावी अध्यापन पद्धती, संशोधना भिमुख वातावरण आणि विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या आधारे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संस्थेच्या डी. फार्मसी व अभ्यासक्रमांनी निर्धारित गुणवत्ता निकष यशस्वीरीत्या पूर्ण करत संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षण, उत्कृष्ट निकाल व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात संस्था सातत्याने अग्रेसर राहिली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी प्राचार्य डॉ. पंकज चौधरी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच भविष्यातही गुणवत्ता, संशोधन आणि नावीन्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. या गौरवास्पद यशानिमित्त महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संस्थेच्या या यशाचा आनंद साजरा केला.



