*जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फतविविध महत्त्वाच्या सर्वेक्षणांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फतविविध महत्त्वाच्या सर्वेक्षणांचे आयोजन*
*जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फतविविध महत्त्वाच्या सर्वेक्षणांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत (MoSPI) कार्यरत असलेले राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), उप-क्षेत्रीय कार्यालय जळगाव यांच्यामार्फत जुलै 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सांख्यिकी उप क्षेत्रीय कार्यालयाचे जळगांव कार्यालयाचे सहायक निदेशक पी. व्ही. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
देशाच्या धोरणनिर्मितीसाठी व विकासाच्या नियोजनासाठी अत्यंत आवश्यक असलेली व्यापक आर्थिक आकडेवारी संकलित करणे हा या सर्वेक्षणांचा मुख्य उद्देश असून सन 1950 पासून कार्यरत असलेले राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विश्वासार्ह आकडेवारी सातत्याने संकलित करत आहे. यावर्षी राबवल्या जाणाऱ्या प्रमुख सर्वेक्षणांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: प्रमुख सर्वेक्षणे आणि त्यांचे उद्देश:
नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण: ग्रामीण व शहरी भागातील रोजगार, बेरोजगारी, कामगार सहभाग दर आणि कामगार-लोकसंख्या गुणोत्तर यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणे. वार्षिक असंघटित क्षेत्र उपक्रम सर्वेक्षण: उत्पादन, व्यापार व इतर सेवा क्षेत्रातील असंघटित बिगर- कृषी उद्योगांची आर्थिक स्थिती जाणून घेणे.
कर्ज, गुंतवणूक व शेतकरी स्थिती मूल्यांकन सर्वेक्षण: कृषी कुटुंबांची आर्थिक स्थिती, जमीनधारणा, उत्पन्न, कर्जबाजारीपणा व शेती पद्धतींविषयी माहिती संकलित करणे. किंमत आकडेवारी संकलन: महागाई दर (Consumer Price Index) व औद्योगिक उत्पादन निर्देशक तयार करण्यासाठी नियमित किंमतींची माहिती गोळा करणे.
इतर महत्त्वाची सर्वेक्षणे: याशिवाय स्थलांतर तपशील सर्वेक्षण, राष्ट्रीय कुटुंब उत्पन्न सर्वेक्षण, वार्षिक उद्योग सर्वेक्षण, कृषी सांख्यिकी पर्यवेक्षण आणि नागरी फ्रेम सर्वेक्षण ही सर्वेक्षणे देखील हाती घेतली जाणार आहेत.
जिल्ह्यातील निवडक गावे व नगर क्षेत्रे: ग्रामीण भाग: कधेल, बोरद, इछागाव्हाण (तळोदा), काकरदे बू, पिन्गाने, पाडलदे बू,खैरवे, भाड़े, काथरडे खु, सुलवाड़े (शहादा), झामन्ज़र (नवापूर), पथराई, रनाळे, भालेर, उमरदे खु, होल तर्फे हवेली, दहींदले बू. (नंदुरबार), कुम्भारी, धनाजे बू, चित्तार, तोरणमाल जूने (अक्राणी), बोखाडी, मोगरा, वेलखाड़ी (अक्कलकुवा),
नागरी/शहरी भाग: तलोदे, नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, खापर आणि धडगाव- वडफल्या-रोषमाल बू.नागरिकांना व प्रतिसादकर्त्यांना सहकार्याचे आवाहन:
सदर सर्वेक्षणांसाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे प्रगणक (संख्या मित्र), कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी आणि वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक गावे आणि शहरी भागातील कुटुंबांना व आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या सर्वेक्षणांमधून संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते व तिचा वापर केवळ धोरणनिर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे नागरिकांनी, उद्योजकांनी व शेतकरी बांधवांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अचूक व वस्तुनिष्ठ माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, असेही आवाहन सहाय्यक निर्देशक पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



