*तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक*
*तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटन विभागाच्या वतीने मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक संपन्न झाली. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीत तोरणमाळ पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास, पर्यटन सुविधांचा विस्तार, पायाभूत सुविधा बळकटीकरण तसेच पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी आणि पुढील कृती आराखडा सादर केला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी चर्चेत सहभागी होऊन मुद्दे मांडले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन संचालनालयाचे अधिकारी, नंदुरबारचा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, उपसंचालक (पर्यटन) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तोरणमाळचा पर्यटन विकास अधिक गतिमान करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करून तोरणमाळला राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला.



