*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
*नरसी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
नांदेड(प्रतीनिधी):-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त नरसी (ता. नायगांव) येथे शनिवारी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. जयंती सोहळ्याच्या प्रारंभी डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, राजेश पाटील भिलवंडे, माजी सरपंच गजानन भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहिमबेग पटेल, मोहन पाटील भिलवंडे, मधूकर पाटील ताटे, माजी सरपंच एन. डी. नरसीकर, अलीमबेग पटेल, ग्रामपंचायत अधिकारी नागेश यरसनवार, गंगाधरराव गंगासागरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा, साहित्यिक योगदानाचा तसेच सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा आदर्श युवकांनी स्वीकारून समाज परिवर्तनासाठी कार्य करावे, असे आवाहनही केले .
जयंतीनिमित्त जयंती मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. दुपारनंतर नरसी शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली जोरदार घोषणांच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत समाजबांधव, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी लालबा सूर्यवंशी, जळबा सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, गोविंदा सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, बाबू सूर्यवंशी, साईनाथ सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, केरबा सूर्यवंशी, सदाशिव सूर्यवंशी, गुंडेराव सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, साईनाथ सूर्यवंशी आदी पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने स.पो. नि. विक्रम हाराळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.



