*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
*"नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आदिवासी संस्कृतीचा जागर;जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगाव येथे भव्य पारंपरिक ढोल वादन स्पर्धेचे आयोजन"*
धडगाव(प्रतिनिधी):-जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून धडगाव येथे पारंपरिक आदिवासी ढोल वादन स्पर्धेचे आयोजन नंदुरबार जिल्हा पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे. आदिवासी समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा. लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व आदिवासी ढोल पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेमुळे युवा पिढीत पारंपरिक कला आणि संस्कृतीबाबत अभिमान व जागरुकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी 1 लक्ष 21 हजार दद्वितीय क्रमांकासाठी 1 लक्ष 15 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 1 लक्ष 10 हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या इतर सर्व ढोल पथकांना 11 हजार रुपये प्रोत्साहनपर मानधन देण्यात येणार आहे. याच्यात परंपरागत वेश-भुषा याकरिता सुध्दा पारितोषिके देण्यात येणार आहे. परिसरातील आदिवासी बांधव, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.संपर्कासाठीः
9823811780. पोनि. सुनील भाबळ, 9011220697. पोनि. अर्जुन पटले
7745858005. सपोनि. धर्मराज पटले,9764006918. सपोनि. विश्वास पावरा
9082117725. सपोनि. दिपक पावरा, 7822090335. पोहवा. प्रताप पावरा