*तळवडे-मूर खिंडीतील वाघीत्रा डोंगरकरबाबा देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आर्डे यांनी केली लादी व पत्रा शेडची सोय*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळवडे-मूर खिंडीतील वाघीत्रा डोंगरकरबाबा देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आर्डे यांनी केली लादी व पत्रा शेडची सोय*
*तळवडे-मूर खिंडीतील वाघीत्रा डोंगरकरबाबा देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आर्डे यांनी केली लादी व पत्रा शेडची सोय*
पाचल(प्रतिनिधी):-पाचल-जवळेथर राज्यमार्गावर तळवडे-मूर खिंड येथे असले जागृत वाघीत्रा डोंगरकरबाबा देवस्थान नवसाला पावणारे देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. दररोज हजारो वाहनचालक व भाविक या मार्गाने जाताना येथे थांबून दर्शन घेतात आणि पुढे जातात.
मात्र हे देवस्थान डोंगरातील दुर्गम ठिकाणी असल्याने भाविकांना उन्हाळ्यात उन्हाची व पावसाळ्यात पावसाची मोठी झळ बसत होती. दर्शनासाठी उभे राहायलाही पुरेशी जागा नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन काजिर्डा गावचे सुपुत्र व सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आर्डे यांनी स्वतः च्या खर्चातून देवस्थानाचे सुशोभिकरण करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी देवस्थान परिसरात भाविकांसाठी पत्रा शेड उभारली असून उभे राहण्यासाठी लादी बसवून दिली आहे. या नव्या सोयीमुळे आता भाविकांना निवांतपणे दर्शन घेता येत आहे. अनेक भाविकांचे नवस या ठिकाणी फेडले जात असल्याने या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवाजी आर्डे यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि भाविकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे देवस्थानाला नवी झळाळी मिळाली आहे.