*वडिलांच्या अकाली निधनाच्या दुःखावर मात करत कळसवली शाळा 1 च्या सौम्या सुर्यकांत पडयार हिचे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडिलांच्या अकाली निधनाच्या दुःखावर मात करत कळसवली शाळा 1 च्या सौम्या सुर्यकांत पडयार हिचे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
*वडिलांच्या अकाली निधनाच्या दुःखावर मात करत कळसवली शाळा 1 च्या सौम्या सुर्यकांत पडयार हिचे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*
राजापूर(प्रतिनिधी):-राधाकृष्ण सेवा मंडळ, तळेकरवाडीचे सभासद कै. सूर्यकांत जनार्दन पड्यार यांची कन्या कु. सौम्या सूर्यकांत पड्यार हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती (PSE) परीक्षेत पात्र ठरून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु सौम्या ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, कसवली नं. 1 येथील विद्यार्थिनी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने हे यश मिळवले आहे. वडिलांच्या अकाली निधनाच्या दुःखावर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर तिने हे यश संपादन करून इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या यशामागे मुख्याध्यापक कोसंबे गुरुजी यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि आईची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे सौम्याला हे यश मिळवणे शक्य झाले कु. सौम्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राधाकृष्ण सेवा मंडळ, तळेकरवाडी तसेच ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



