*उध्दव ठाकरें यांच्या वाढदिनी "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" ग्रुपतर्फे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि अल्पोपहार वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उध्दव ठाकरें यांच्या वाढदिनी "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" ग्रुपतर्फे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि अल्पोपहार वाटप*
*उध्दव ठाकरें यांच्या वाढदिनी "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" ग्रुपतर्फे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि अल्पोपहार वाटप*
मुंबई(प्रतिनिधी):-26 जुलै 2026 रोजी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे" यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेल्या "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपच्या वतीने मातोश्री बंगल्यावर दरवर्षी लाडू वाटपाचा कार्यक्रम असतो. पण मस्तवाल सरकारच्या हलगर्जी पणामुळे सतत होत असलेल्या NTA च्या गलथान कारभारामुळे दिल्ली मधील जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसानं मार्फत लाठीमार करण्यात आला याचा निषेध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वाढदिवस साजरा करणार नाही असे जाहीर केले. "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या आमच्या ग्रुपच्या वतीने उद्धव साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य जमा केलेली मदत दादर शिवाजी पार्क येथे जंतर मंतर येथील निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि सुखा अल्पोहार याचे वाटप करण्यात आले. "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या आमच्या ग्रुपच्या वतीने 33 वा सामाजिक उपक्रम पूर्ण करण्यात आला या आंदोलनात ग्रुपचे कमीतकमी पन्नास ते साठ सदस्य यांनी सहभाग घेतला होता.